शेतातून कुटुंब परतले, बघतात तर शुभमने फाशी घेतलेली!

बुलडाणा तालुक्‍यातील धक्कादायक घटनेने हादरले वरवंड!
 
फाशी
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः  २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास वरवंड (ता. बुलडाणा) येथे समोर आली.

शुभम मंगल गिरी (रा. वरवंड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. शुभम खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. काल घरातील इतर  सदस्य शेतात गेलेले असताना शुभमने  घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने  गळफास  घेतला.

घरातील सदस्य संध्याकाळी घरी परतले तेव्हा शुभम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला तातडीने बुलडाण्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयातच आज, १३ डिसेंबर रोजी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.