बुलडाण्यात जळक्यांचा कारनामा! चिंचोले चौकातील चौपाटीवरील साई चायनीज ची गाडी पेटवली; स्वाभिमानीच्या पवन देशमुखांमुळे अनर्थ टळला; अन्यथा झाला असता अग्नितांडव...
Updated: Apr 7, 2024, 10:44 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मागील काही दिवसांपासून बुलडाणा शहरात गाड्या पेटवण्याचा घटना उघडकीस आल्या आहेत. व्यवसायात वाढती लोकप्रियता पाहून काही जळावू वृत्तीच्या लोकांनी हे कांड केले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे . काल चिंचोले चौकातील प्रसिद्ध चौपाटीवर रात्री १२:३० वाजेच्या सुमारास अज्ञातांनी साई चायनीज शॉपला डिझेल टाकून पेटवून दिले.
दरम्यान स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पवन देशमुख यांनी प्रसंगावधान दाखवत आजूबाजूच्या लोकांकडून पाणी आणून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अन्यथा मोठा अग्नीतांडव झाला असता. त्याच चायनीज गाडीत दोन सिलेंडर ठेवलेले होते. त्यामुळे मोठी हानी नाकारता येणे शक्य न्हवते. शिवाय या गाडीच्या बाजूला खाद्यपदार्थाची अनेक दुकाने लागलेली आहेत. कुणीतरी जळाववृत्तीचा लोकांनी हे कांड केले असावे अशी शंका साई चायनीज शॉप चे ज्ञानेश्वर कांबळे यांनी व्यक्त केली आहे. मागील महिन्यात देखील क्रीडा संकुल रोडवरील पांडुरंग लॉन्स समोर एक डीजेची गाडी पेटवण्यात आली होती. शहरात अशा पद्धतीच्या घटना घडू नये, तसेच यावर अंकुश बसावा अशी मागणी करण्यात आली आहे.