बावीस वर्षीय युवकाचा कारनामा! शेजारी राहणाऱ्या एकोणतीस वर्षीय विवाहितेचा आंघोळ करतानांचा व्हिडिओ काढला!

 
क्राईम
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेजारी राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे.
एकोणतीस वर्षीय विवाहिता आपल्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करत होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या २२ वर्षीय युवकाने २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान बाथरूमच्या खिडकीमधून मोबाईल द्वारे व्हिडिओ व फोटो काढल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यात घडली आहे. ही बाब विवाहितेच्या लक्षात येतात तिने त्या त्या युवकाला जाब विचारला असता, मी व्हिडिओ काढला ही बाब तू कोणाला सांगू नको, कोणाला सांगितले तर मी तुला व तुझ्या मुलींना सुखाने जगू देणार नाही, तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी विवाहितेने पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.