घरच्यांनी आवाज दिले, तरी दरवाजा उघडला नाही! पोलिसांना बोलावून खिडकीच्या काचा फोडल्या.. आतले दृश्य पाहताच सगळेच हादरले ! नांदुऱ्यात घडली आक्रित घटना..

 
Gbvv
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) नांदुरा येथील शिक्षक कॉलनी भागात ८ जुलैच्या दुपारी धक्कादायक घटना घडली. सेवानिवृत्त शिक्षक सखाराम अंभोरे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. 
अंभोरे यांची ३९ वर्षीय मुलगी वर्षा ही सोमवारी सकाळी उठली आणि वरच्या मजल्यावरील खोलीत गेली. यावेळी घरचे सगळे सदस्य खाली दैनंदिन कामात गुंतलेले होते. दुपारी १२ च्या सुमारास वर्षाला उठविण्याचा प्रयत्न झाला तरी ती उठली नाही. खूप वेळ आवाज देऊनही दरवाजा उघडत नसल्याने अंभोरे कुटुंबीयांना चिंता झाली. सर्वांचा जीव कासावीस होत होता.
यानंतर परत, दुपारी पावणेतीन च्या सुमारास वर्षाच्या वडिलांनी ११२ क्रमांक डायल केला आणि स्थानिक पोलिसांना बोलावले. पोलिसांनी वर्षा असलेल्या खोलीची काच फोडली. त्यांनतर त्यांना जे दृश्य दिसले ते, अतिशय हादरवणारे होते. वर्षाही घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. नायलॉन दोरीने बांधून तिने गळफास लावून घेतला होता. हे पाहताच तिच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. वर्षा ही गत १५ वर्षांपासून मनो रुग्णासारखी वागत असल्याने तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. असे वर्षाचे वडील सखाराम अंभोरे यांनी पोलिसांना सांगितले. प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.