अनेक ठिकाणी उपचार घेऊन बिमारी ठीक होत नव्हती,त्यामुळे विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय! मोताळा तालुक्यातील घटना

 
hhf
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आजाराला कंटाळून कोण काय निर्णय घेईल याचा नेम नाही. मोताळा तालुक्यातील विवाहितेवर आजाराचा बाका प्रसंग उद्भवला..अनेक ठिकाणी उपचार केले, पैसे खर्च झाले मात्र आजार काही बरा झाला नाही. अखेर महिलेने आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी टोकाचा निर्णय घेतला.
 

धामणगाव देशमुख शिवारात ४५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आशा गजानन टाकसाळ असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. आशा टाकसाळ यांना वाताचा त्रास होता. अनेक ठिकाणी उपचार घेऊन देखील त्यांचा आजार बरा झाला नाही. याच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचे पती गजानन टाकसाळ यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली,असून तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यशवंत तायडे करीत आहेत.