जेसीबीखाली दबून तरुणाचा मृत्यू! चार मुलींच्या जन्मानंतर झाला होता अक्षयचा जन्म; मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख गावात हळहळ

 
fghj

मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतात नाल्याचे काम सुरू असताना अचानक जेसीबी पलटी झाल्याने तरुणाचा त्याखाली दबून मृत्यू झाला. मेहकर तालुक्यातील शहापूर - उमरा देशमुख रस्त्यावरील पुलाजवळ काल, ९ जूनच्या संध्याकाळी ही घटना घडली. अक्षय  किसनराव देशमुख ( रा. उमरा देशमुख) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार पावसाळ्यात शेतात पाणी शिरू नये म्हणून अक्षयच्या शेतात नाला खोदण्याचे काम जेसीबी मशीनद्वारे सुरू होते. यावेळी अक्षय केबिन मध्ये चालकाच्या शेजारी बसलेला होता. अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने जेसीबी पलटी झाली. यात जेसीबी खाली अक्षय दबला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत अक्षयला बाहेर काढले आणि ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी अक्षयचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

चार बहिणींनाचा एकुलता एक भाऊ होता...!

चार मुलींच्या जन्मानंतर आई वडिलांना अक्षयच्या रूपाने मुलगा झाला होता. त्यामुळे अक्षय कुटुंबात लाडका होता. तीन वर्षांपूर्वी अक्षयच्या वडिलांचे निधन झालेले असून आईला अर्धांगवायू मुळे अपंगत्व आले आहे. यामुळे शिक्षणासह कुटुंबाचा भार अक्षय सांभाळत होता. आता आधार हरवल्याने अक्षयच्या आईचा आधार आणि बहिणींचा लाडका भाऊ हरवला आहे.