सूनबाई न सांगता घरातून निघून गेल्या... सासऱ्याची पोलिसांत धाव!, खामगाव शहरातील घटना

 
file photo
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३२ वर्षीय सून घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी निघून गेल्याची तक्रार सासऱ्याने खामगावच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. त्‍यावरून पोलिसांनी हरवल्याची नोंद घेऊन शोध सुरू केला आहे.

सोनाजी हरिभाऊ तायडे (६५) हे सुटाळा बुद्रूकमध्ये राहतात. त्‍यांची सून सौ. शारदा विनोद तायडे ५ जानेवारीपासून बेपत्ता आहे. आजपर्यंत सूनबाईचा सगळीकडे शाेध घेतला. खामगाव परिसरात, नातेवाइकांकडे, फोनद्वारे, प्रत्यक्षात जाऊन शोध घेतला. मात्र त्‍या मिळून आल्या नाहीत, असे सासऱ्याने तक्रारीत म्‍हटले आहे. सौ. शारदा तायडे यांचे वर्णन असे ः रंग गोरा, उंची ५ फूट, बांधा मध्यम, डोक्याचे केस काळे व लांब, चेहरा लांबट, अंगात गुलाबी साडी, पांढरा ब्लाऊज, डाव्या हातावर विनोद गोंदलेले.  तपास पोहेकाँ श्री. घुगे करत आहेत.

तीन दिवसांत सहा बेपत्ता
गेल्या तीन दिवसांत सहा जण जिल्ह्यातून बेपत्ता झाले अाहेत. यात राहुल ज्ञानदेव घाटोळ (२१, रा. नावकर मळा, शेगाव, पोलीस ठाणे शेगाव), किरण कमलेश इंगळे (२२, रा. शेलोडी, ता. खामगाव, पोलीस ठाणे खामगाव ग्रामीण), कांचन गजानन टेकाडे (२१, रा. सांगळद, ता. मोताळा पोलीस ठाणे बोराखेडी), रोहिनी विशाल जाधव (२४, रा. गजानननगर, चिखली, पोलीस ठाणे चिखली), सदाशिव तुळशीराम पवार (७०, रा. शेंदला, ता. मेहकर, पोलीस ठाणे मेहकर) यांचा समावेश आहे.