मुलानेच पाडला जन्मदात्या बापाचा मुडदा! बाबूंच्या काठ्या डोक्यात हाणल्या; जळगाव जामोद तालुक्यातील घटना
 Apr 2, 2023, 09:20 IST
                                            
                                        
                                    जळगाव जामोद( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुलानेच जन्मदात्या बापाचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार जळगाव जामोद तालुक्यात समोर आलाय. जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या  पिंपळगाव काळे शिवारातील एका विटभट्टीवर ही घटना घडली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला, आधी शाब्दिक चकमक आणि त्यानंतर झालेल्या हाणामारीत बापाचा जीव केला. नानसिंग पहाडसिंग भैरड्या (६०) असे मृतकाचे नाव असून त्यांचा मुलगा भाऊसिंग नानसिंग भैरड्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
                                    प्राप्त माहितीनुसार भैरड्या कुटुंब पिंपळगाव काळे शिवारातील हरिभाऊ तायडे यांच्या वीटभट्टीवर कामाला होते. रात्री पिता पुत्रात घरघुती वादावरून भांडण झाले. शाब्दिक चकमक झाल्यानंतर भाऊसिंग भैरड्या याने त्याच्या बापाच्या डोक्यात बांबूच्या काठ्या हाणल्या त्यातच त्यांचा जीव गेला. घटनेची माहिती कामावरील माणसांनी विटभट्टी मालकाला दिली, त्यानंतर जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भाऊसिंग भैरड्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

 
                            