कारने दुचाकीला ठोकले! दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू; धाडच्या सहकार विद्यामंदिराजवळ झाला अपघात

 
bike

धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मारोती अल्टो कार व दुचाकीमध्ये काल, २१ एप्रिलच्या दुपारी १२.२० वाजे दरम्यान धाड ते संभाजीनगर महामार्गावर असलेल्या स्थानिक सहकार विद्या मंदर जवळ समोरासमोर जबर धडक झाली. या धडकेत २३ वर्षीय युवक जागीच ठार झाला. या प्रकरणी धाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कार चालकाला अटक करण्यात आली आहे.

ढासाळवाडी (ता. बुलडाणा) येथील रहिवासी असलेल्या संतोष विश्वनाथ शेवाळे (वय २३ वर्षे) हा २१ एप्रिल रोजी दुपारी १२.२० वाजता त्याच्या ताब्यातील एचएफ डिलक्य कंपनीची मोटारसायकल क्रमांक एचएच २८-बीटी- ९५३० ने आव्हाना (ता. भोकरदन) येथून ढासाळवाडीकडे जात होता. तर यातील आरोपी दिलीपकुमार हेमप्रकाश बघेल (रा. नुरपूर ता. शकिर, उत्तरप्रदेश) ह.मु. जळगाव खांदेश हा त्याच्या ताब्यातील मारोती कंपनीची अल्टो कार क्रमांक एमएच- ०३ - बीएच-१९६९ ने धाड वरुन संभाजीनगरकडे जात होता. दरम्यान, याच मार्गावर असलेल्या सहकार विद्या मंदिर नजिक मोटारसायकल व अल्टो वाहनात जबर धडक झाली. या धडकेत संतोष विश्वनाथ शेवाळे हा घटनास्थळीच ठार झाला. अपघातानंतर चालक बघेल याने पोलीस स्टेशन गाठून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.

या प्रकरणी दीपक वसंतराव शेवाळे यांनी धाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी दिलीपकुमार हेमप्रकाश बघेल याच्या विरोधात भादंविचे कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार मनिष गावंडे यांच्या मार्गदर्शनात धाड पोलीस करीत आहेत