समृध्दी महामार्गावर हवा चेक करायला बस थांबवली! मागून आलेल्या ट्रकने दिले ठोकून; दोघांचा जागीच मृत्यू! आज सकाळी मेहकरजवळ झाला अपघात...

 
Ncnxn
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृध्दी महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. नियमाचे पालन न करणे बस चालकाच्या जीवावर बेतले. हवा तपासायला बस चालकाने बस थांबवली. चालक बसच्या मागच्या बाजूची तपासणी करीत असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात बस चालकासह बसच्या मागील सीटवर बसलेला एक प्रवाशी जागीच ठार झाला. 
    
Bxnxn                          जाहिरात👆
प्राप्त माहितीनुसार एम एच १४, एच जी ५९९९ क्रमांकाची खाजगी बस नागपूरकडे जात होती. सकाळी साडेपाच च्या सुमारास टायर मधील हवा कमी झाल्याचे वाटल्याने बस चालकाने बस रस्त्याच्या थोडी कडेला उभी केली. त्यानंतर चालक बसच्या मागील बाजूची तपासणी करीत होता. यावेळी मागून आलेल्या डब्लू बी २३, ई ०८०३ क्रमांकाच्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात बस चालक व बसच्या मागील सीटवर बसलेल्या एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले..अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
तर अपघात टळला असता.. 
ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे नियमानुसार वाहन उभे करण्याची परवानगी नाही. घटनास्थळाच्या अगदी १०० मीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूला वाहन पार्क करण्याची व्यवस्था होती, मात्र बस चालकाने रस्त्यात वाहन थांबवले. चालकासह एका प्रवाशाचा हकनाक बळी गेला..