BREAKING टिप्परवाले सुसाट! बुलडाण्याच्या संगम चौकात भीषण अपघात! टिप्परने स्कूटीला उडवले; महिला गंभीर जखमी

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील संगम चौकात आज, ११ डिसेंबरच्या सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास टिप्परने स्कुटीला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये सुनीता संदीप पंडित (३० वर्ष) यांना गंभीर दुखापत झाली आहे. 
अपघातानंतर त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल केले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपाती संभाजीनगर येथे हलविले आहे. प्राप्त माहितीनुसार एम. एच.२८ एबी.७३७७ क्रमांकाच्या टिप्परने स्कुटीला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातामधील टिप्पर बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात केले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.