'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या युवकाचा बुलडाण्यात आढळला मृतदेह! मृत्यूचे गूढ उलगडण्याचे पोलिसांसमक्ष आव्हान!!

 
buldaa
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह बुलडाणा येथील जिल्हा सहकारी बँके नजीकच्या इमारतीमध्ये आज, ९ फेब्रुवारी रोजी दुपारी  आढळून आला.
 

  गोपाळ विठ्ठल इंगळे(३२ रा. अमडापुर) असे मृतकाचे नांव आहे. गोपाळ आपल्या इतर ३ मित्रासोबत भाड्याने रूम करून त्या ठिकाणी राहत होता. आज दुपारी त्याने आपल्या सहकाऱ्याला  फोन करून लवकर रूमवर बोलावले. त्याचा मित्र जेव्हा रूम मध्ये दाखल झाला तेव्हा गोपाल जमिनीवर पडलेला होता. मित्राने ईतरांच्या  सहाय्याने तात्काळ त्याला एका खाजगी रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला . गोपालच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसून अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.