दुचाकी एकमेकांना धडकल्या; एक ठार, एक जखमी

जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना
 
दुचाकीस्वार बुलडाणेकरांनो जरा ही बातमी वाचा… त्‍या दुर्लक्षामुळे अपघात, युवक गंभीर जखमी; बुलडाणा तालुक्‍यातील घटना
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर दुसरा मोटारसायकलस्वार जखमी झाला. ही घटना काल, २७ डिसेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृतकाच्या चुलत भावाने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी जखमी मोटारसायकलस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अतुल सुधाकर दाभाडे पाटील (३०, रा. सावरगाव ता. जळगाव जामोद) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. तो खामगावच्या एचडीएफसी बँकेत कार्यरत आहे. बँकेच्या कामानिमित्त बाहेरगावी फिरत असतो. काल सायंकाळी अतुल व श्याम श्रीराम कव्हळे हे दोघे जण संग्रामपूरहून मोटाररसायकलने (MH 27 BY 2253) सावरगावला येत असताना निंभोरा फाट्यावर समोरून येणाऱ्या हिरो होंडा एसएस कंपनीच्या मोटारसायकलीचा (MH 31-4713) चालक संदीप प्रल्हाद उगले (४० रा. अंत्री बोराखेडी ता. मोताळा) याने ताब्यातील मोटासायकल भरधाव व निष्काळजीपणे चालवून धडक दिली. यात अतुल जागेवरच मरण पावला. त्याच्यासोबतचा श्याम जखमी झाल्याने पुढील उपचाराकरीता खामगाव येथे हलविण्यात आले आहे.