बँकेवाले परेशान करत आहेत, पत्नीला कॉलवरून सांगितले अन्....बंदुकीतून गोळी डोक्यात आरपार शिरली, भिंतीला लागून खाली पडली!
पोलीस कॉन्स्टेबल अजय गिरींच्या आत्महत्येचा घटनाक्रम "असा"; लेकराचा, पत्नीचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा....
Jul 31, 2024, 21:05 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीचे आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी आज,३१ जुलैला साडेचारच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बुलडाणा येथील पोलीस वसाहतीत ही घटना घडली..या घटनेचा विस्तृत असा घटनाक्रम समोर आला आहे..अजय गिरींचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि विनोदी होता, त्यामुळे एवढा टोकाचा निर्णय त्यांनी का घेतला असा प्रश्न उपस्थित होत होता..आता आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे..
अजय गिरी यांची आज सुट्टीवर होते. काल ते,आमदार श्वेताताई महाले यांच्यासोबत होते. आज त्यांच्याऐवजी श्री.राऊत हे अंगरक्षक म्हणून आमदार श्वेताताई यांच्यासोबत होते. आज सुट्टी असल्याने अजय गिरी कुटुंबासोबत होते. दुपारी ते पत्नीला घेऊन बँकेत खाते काढण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारच्या वेळेला त्यांनी पत्नी दिपाली यांना घरगुती खरेदीसाठी पैसे दिले..त्यामुळे घरघुती कामासाठी दिपाली या बाहेर गेल्या होत्या.काही वेळाने त्यांचे आणि पती अजय गिरी यांचे फोनवर बोलणे झाले, बँकेवाले परेशान करत आहेत, खूप टेन्शन आले आहे असे ते पत्नी दिपाली यांना फोनवर सांगत होते. त्यावेळी फोनवर बोलत बोलतच दिपाली ह्या घरी आल्या..
मी तुझ्यासाठीच थांबलो होतो...
पत्नी दिपाली घरी आल्यानंतर मी तुझ्यासाठीच थांबलो होतो असे अजय गिरी पत्नीला उद्देशून म्हणाले. त्यावेळी दिपाली यांनी पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, काळजी करू नका असे त्या पतीला म्हणत होत्या. साडेचारच्या सुमारास दोघे पती पत्नी घरातील बेडरूम मध्ये होते. त्यावेळी पिस्टल अजय गिरी यांच्याजवळच होते. अचानक अजय गिरी उठले आणि त्यांनी बंदूक डोक्याला लावली, तेवढ्यात दिपाली यांनी बंदूक हिसकण्याचा प्रयत्न केला मात्र पत्नीच्या हाताला झटका देत अजय गिरी यांना एका क्षणात फायर केले..दुसऱ्या क्षणाला अजय गिरी रक्ताच्या थारोळ्यात होते..पत्नी दिपाली आणि मुलगा प्रथमेश यांनी आरडाओरड केल्याने शेजारी धावत आले, गिरी यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले..
मम्मा तू रडू नको ना...
अजय गिरी यांचा ८ वर्षाचा मुलगा प्रथमेश आक्रोश करणाऱ्या आईची समजूत काढत होता..मम्मा प्लीज रडू नको ना..शांत हो ना..असे तो म्हणत होता..यावेळी तिथे उपस्थित सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या..
पत्नीला पोलीस भरतीसाठी घेऊन गेले होते मुंबईला...
अजय गिरी यांच्या पत्नी दिपाली
ह्या पोलीस भरतीची तयारी करत होत्या. ८ दिवसांपूर्वी पत्नी दिपाली यांच्या पोलीस भरतीसाठी अजय गिरी मुंबईला गेले होते. आमदार श्वेताताई यांच्या आमदार निवासातच त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. "ते माझ्यावर त्यांची मुलगी असल्यासारखे प्रेम करायचे, खूप जीव लावायचे" असे सांगत पत्नी दिपाली हुंदके देत रडत होत्या..
आमदार श्वेताताई महाले तातडीने पोहचल्या..
घटनेची माहिती मिळताच आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी बुलडाणा गाठले. अजय गिरी यांच्या घरी जाऊन गिरी कुटुंबियांना धीर दिला. ही घटना माझ्यासाठी शॉकिंग आहे, तो माझ्यासाठी भावासारखा होता असे आमदार श्वेताताई म्हणाल्या..
घरात रक्ताचा चिखल.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी आत्महत्या करत असताना वापरलेली पिस्तुल, डोक्यात आरपार शिरून खाली पडलेली बंदुकीची गोळी ताब्यात घेतली. घरात सर्वत्र रक्ताचा चिखल पडलेला होता..
भाऊ जेलमध्ये, वहिनीची आत्महत्या...
अजय गिरी यांच्या वाहिनीने काही दिवसांआधी आत्महत्या केली होती. त्या प्रकरणात त्यांचा मोठा भाऊ सध्या कारागृहात आहे..त्यामुळे देखील अजय गिरी तणावात होते असे सांगण्यात येत आहे..