बँकेत गर्दी झाली, भामट्याने फायदा घेतला! दीड लाख लांबवले.....
साखरखेर्डा येथील चिखली अर्बन बँकेत रताळी येथील शेतकरी ज्ञानेश्वर तेजराव पाटील हे कर्जाचे पैसे भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या दोन चोरट्यांनी यांच्याकडे असलेल्या थैलीला धारधार ब्लेडने कट मारून ही रोख रक्कम पळवली. ज्ञानेश्वर तेजराव पाटील यांचे शेडनेट आहे. त्यात ते बीजोत्पादन करतात. त्याचे पैसे स्टेट बँकेत जमा झाले होते. तेथून पाच लाख रुपये काढून चिखली अर्बन बँकेच्या कर्ज खात्यात तीन लाख रुपये जमा करण्यासाठी ते गेले होते. तेव्हापासूनच चोरटे त्यांच्या मागावर होते. चिखली अर्बनमध्ये काऊंटवर ते पैसे जमा करण्यासाठी पाटील उभे राहिले. त्यावेळी दोन अज्ञात चोरटे त्यांना अगदी खेटून उभे राहिले होते. त्यातील एकाने ब्लेडने यांच्याकडील थैलीला कट मारून त्यातील रोख रक्कम पळवली. या प्रकरणी ज्ञानेश्वर पाटील यांनी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.