जोडणाऱ्याचे दुकान फोडले; घटना मोताळा तालुक्यातील....

 
चोरी
मोताळा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) वेल्डींगचे दुकान फोडून चोरट्यांनी ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ११ ऑगस्टच्या सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे....
Butekar
Advt 👆
मोताळा तालुक्यातील जयपूर येथील महादेव निनाजी सोनुने (३१) यांची गावातीलच बसस्टॉप परिसरात जय गजानन वेल्डींग वर्कशॉप ही दुकान आहे. त्यांनी शनिवारी (ता. १०) रात्री साडेसात वाजता दुकान बंद केली व घरी निघून गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचा कुलूप तोडून आत प्रवेश केला व दुकानातील कॉम्प्रेशर मशीन, ड्रील मशीन, इलेक्ट्रीक काटा, वेल्डींगचे मोठे मशीन, वेल्डींगचे लहान मशीन आणि वेल्डींगसाठी आणलेले ग्रील, जिना, गेट असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 11 ऑगस्टच्या वाजता सोनुने हे सकाळी साडेआठ वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता, सदर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोनुने यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे