२२ वर्षीय तरुणाने टोकाचा निर्णय घेतला! अमडापूर परिसरात हळहळ

 
crime
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी तरुणाने टोकाचा निर्णय घेत जग सोडण्याचा निर्णय घेतला. गळफास घेऊन आत्महत्या करीत राम प्रभाकर गुंजकर (२२, रा. टाकरखेड हेलगा, ता - बुलडाणा) या तरुणाने जीवन संपवले.
 
२८ मार्चच्या दुपारी अडीचच्या सुमारास राम त्याच्या काकाच्या शेतात गेला. शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला. रामच्या काकाने तशी माहिती अमडापूर पोलीस ठाण्यात दिली.ठाणेदार नागेश चतरकर यांच्या सूचनेनुसार ए.एस.आय लक्ष्मण टेकाळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. राम ने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही . तपास सुमिरसिंह ठाकुर करीत आहेत.