देऊळगाव साकर्शाच्या "त्या" व्यापाऱ्याने मोठे कांड केले! अधिक भाव देण्याच्या आमिषाने ३००पेक्षा अधिक शेतकऱ्यांना १० कोटींनी लावला चुना!
जानेफळ पोलिस ठाण्यातील २ पोलीस कर्मचारीही फसले बिचारे; डिजेच्या तालावर हातात बंदूक घेऊन नाचतोय ढवळे अन् कारकून! बुलडाणा लाइव्ह कडे धक्कादायक व्हिडिओ; व्यापाऱ्यावर वरदहस्त कुणाचा?

जानेफळ पोलीस ठाण्यात यासंबधी शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असल्या तरी सध्या प्रकरण चौकशीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील यासंबंधीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. ढवळे कुटुंब सध्या फरार असून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. ढवळे च्या पाठीशी राजकीय वरदहस्त असल्याचीही चर्चा आहे.
बुलडाणा लाइव्ह कडे धक्कादायक व्हिडिओ..!
दरम्यान या प्रकरणाशी संबंधित लोकांचे धक्कादायक व्हिडिओ "बुलडाणा लाइव्ह" च्या हाती लागले आहे. कैलास ढवळे ,आशिष ढवळे शेतकऱ्यांचा माल खरेदी करायचे. व्यापारी संध्याकाळी हमाल आणि त्याच्या कारकुनांना पार्टी द्यायचा,दारू पाजायचा आणि त्यानंतर डिजे लावून ते नाचायचे अशी माहिती आता समोर येत आहे. बुलडाणा लाइव्ह ला प्राप्त झालेल्या व्हिडीओत व्यापारी आशिष ढवळे, त्याचा सत्यम नावाचा कारकून आणि हमाल व इतर असे डिजेच्या तालावर झिंगाट नाचतांना दिसत आहे. सत्यम च्या हातात पिस्तूल आहे, पिस्तूल उंचावून तो नाचतांना दिसतोय. आमच्या नादाला लागू नका, आमच्यकडे पिस्तूल आहे अशा धमक्या तर व्यापारी व साथीदार शेतकऱ्यांना देत नव्हते ना? याचाही तपास होणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ दीड महिन्याआधीचा असल्याचा सांगण्यात येत आहे. सदर पिस्तूल कुणाची? त्याचा परवाना आहे का? नाचतांना पिस्तूल दाखवण्याचा उद्देश काय या सगळ्या बाबी जानेफळ पोलिसांना तपासाव्या लागणार आहेत.