"त्या" खुन प्रकरणात धक्कादायक कारण समोर! म्हणे, मी तुला मोबाईल दिलाय तु शरीर दे! आधी शारीरिक संबंध ठेवले नंतर चारित्र्यावर संशय घेऊन चिरला गळा! मेहकर तालुक्यातल्या वरूडचा आहे खुनी

 
yuyfu
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिच्यासोबत साखरपुडा झाला, जिच्यासोबत १७ मार्चला लग्न ठरले होते तिच्यावरच लग्नाआधी शारीरिक  संबंधाची भूक भागवण्यासाठी जबरदस्ती करून नंतर गळा चिरून खून केल्याची घटना काही दिवसांआधी  समोर आली होती. दोन्हीकडची पाहुणी मंडळी बस्ता फाडण्यासाठी दुसरबिडला गेल्याची संधी साधून मेहकर तालुक्यातील वरुडचा नवरदेव सुशील सुभाष पवार हा होणाऱ्या बायकोच्या मंठा तालुक्यातील बेलोरा येथे गेला होता, त्याचवेळी तो कारनामा करून फरार झाला होता. दरम्यान पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून पोलिस तपासात दीप्ती उर्फ सपनाच्या खुनाचे वेगळेच कारण समोर आलेय.

सुशील आणि सपनाचे १७ मार्चला लग्न होणार होते. २० डिसेंबरला दोघांचा साखरपुडा झाला होता. दरम्यान १८ फेब्रुवारीला दुपारी दोन्हीकडील पाहुणे मंडळी बस्ता फाडण्यासाठी दुसरबीड येथे आली होती. तिथे सुशील सुद्धा येणार होता, मात्र तो मोटारसायकलने बेलोरा इथे गेला. घरी सपना एकटीच होती, ही संधी साधून सुशील ने लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवू देण्याची इच्छा व्यक्त केली. सपनाने नकार दिला,मात्र आपण होणारे नवरा बायकोचं आहोत असे गोड गोड बोलून सुशील ने जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर सुशील ने सपनाचा गळा चिरला आणि तो फरार झाला..!
    
गुजरातला पळाला सुशील..

  दरम्यान या सगळ्या प्रकारची माहिती झाल्यानंतर बस्ता फाडण्याचे थांबवून सगळी मंडळी बेलोरा येथे पोहचली. घरात सपनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. सपनाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सुशीलसह त्याच्या कुटुंबीयाविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पथके गठित केली,आणि सुशीलला मुंबईतून अटक केले. खून केल्यानंतर सुशील ने गुजरात ला पलायन केले होते, मात्र गुजरातच्या अहमदाबाद येथे काम न मिळाल्याने तो मुंबईत परतला आणि पोलिसांच्या हाती लागला.
   
खुनाचे कारण चारित्र्यावर संशय...!

  दरम्यान पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सुशीलने आधी सपनाशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर तुझे चारित्र्य ठीक नाही असा आरोप सुशीलने सपनावर केला. यामुळे दोघांत कडाक्याचे भांडण झाले, त्यानंतर  सपनाच्या अंगावर बसून त्याने तिचा गळा दाबला आणि त्यानंतर गळा चिरला असे पोलीस तपासात समोर आले आहे.