ठाणेदार विकास पाटलांनी करून दाखवलं ! अंचरवाडी येथील वृध्द जोडप्याला मारहाण करून लूट प्रकरणातील आरोपी गजाआड; त्याने आणखी तिघांची नावे सांगितली....

 
Patil
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पती पत्नी शेतातील गोठ्यात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून जबरी चोरी करण्याच्या उद्याशाने पती पत्नीस लोखंडी रॉड चा धाक धाकून जबर मारहाण केली आणि अंगावरील दाग दागिणे लुटून पसार झाले होते. ही घटना अंचरवाडी वसंतनगर बंजारा तांड्यावर १६ जुलै रोजीच्या रात्रीला १२ वाजेच्या सूमारास घडली होती. या प्रकरणात अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी मोठया हुशारीने चार आरोपी पैकी एकास गजाआड केले.

 अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंचरवाडी वसंतनगर बंजारा तांड्याच्या शेजारी शेतात राहत असलेले सौ. जिजाबाई विष्णू राठोड वय ६० वर्ष व त्यांचे पती विष्णू राठोड हे दोघे पती पत्नी गोठ्यात झोपलेले असतांना रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश केला.  पती पत्नीला लोखंडी रॉडचा धाक धाकून त्यांना जबर मारहाण  करीत महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दाग दागिने चोरून नेले. या प्रकरणाची तक्रार सौ जिजाबाई विष्णू राठोड यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिली होती.

दिलेल्या तक्रारी वरुण ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार यांनी अज्ञात चार आरोपी विरुध्द कलम ३०९,(६),३ (५) बिएन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ठाणेदार विकास पाटील आणि दुय्यम ठाणेदार जारवाल यांनी गोपनीय माहिती वरुण तपास केला. एक संशयिताला पैठण येथे जावून ताब्यात घेतले. परंतु ताब्यात घेतलेल्या आरोपीने मुख्य आरोपी हा अंढेरा येथील एका वाड्यातील आहे, असे सांगताच पोलीस कुमक बोलावून आरोपी कुंडलिक शंकर काळे ( ३० ) याला राहत्या घरातून उचलले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आनखी तीन जण चोरी करण्यासाठी सोबत होते असे सागितले.त्यामुळे लवकरच फरार असलेले तीन आरोपीला अटक करण्यात येईल असे  ठाणेदार विकास पाटील यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी सांगितले.