भीषण अपघात!ट्रकची दुचाकीला धडक; एकाच कुटुंबातील तिघे ठार, सैन्यातील जवानाचा समावेश!खामगाव तालुक्यातील दुःखद घटना.

श्रीकांत अर्जुन सुरवाडे (२६) हे २८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७.१५ वाजताच्या दरम्यान त्यांचा मुलगा हार्दिक रोहित वानखडे वय ४ वर्ष याला लाखनवाडा येथील दवाखान्यात आपल्या दुचाकीने घेवून जात होता. यावेळी सोबत सौ पूजा रोहित वानखडे (२६) व काकू कल्पना शुद्धोधन सुरवाडे (३४, सर्व रा बोरी अडगाव ता.खामगाव) जात असताना बोरी - अडगाव येथील शेख मुमताज यांच्या शेताजवळील पुलाजवळ आंबेटाकळी येथून विटा घेऊन येणाऱ्या ट्रक चालकाने ताब्यातील ट्रक भरधाव व निष्काळजीपणे चालून दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकी वरील सर्व गंभीर जखमी झाले . जखमींवर लाखनवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून अकोला येथे रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच श्रीकांत अर्जुन सुरवाडे, हार्दिक रोहित वानखेडे, व कल्पना शुद्धोधन सुरवाडे या तिघांचा मृत्यू झाला तर पूजा रोहित वानखडे या गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी सिद्धार्थ अर्जुन सुरवाडे (२९) यांनी खामगाव ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालक शे सलीम शे गफ्फार (२६ रा.लाखनवाडा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एपीआय रवींद्र लांडे करीत आहेत.