भीषण अपघात! ट्रकची दुचाकीला धडक ; एक ठार,!
Jan 24, 2024, 13:00 IST
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) काल २२ जानेवारीच्या दुपारी जळगाव जामोद शहरातील नांदुरा रोडवर भीषण अपघात घडला. ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
दुपारी २ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.एम.एच.२८ - ७८८९ क्रमांकाच्या ट्रकची दुचाकीला समोरासमोर धडक झाली.त्यात भिंगारा येथील एक जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी असून त्यांच्यावर जळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभिर असल्या कारणाने त्यांना खामगांव येथे हलविण्यात आले आहे.