भीषण अपघात! वाघजाळ फाट्यावर ट्रकने दुचाकीला उडवले,एकाचा जागीच मृत्यू;एक गंभीर...

 
Crime
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज, ३० डिसेंबरला मोताळा रोडवरील वाघजाळ फाट्यावर भीषण अपघात घडला. ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार दौलत भिका मेढे (रा. खैरखेड) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जगन सूर्यभान गवई (५५वर्ष) व दौलत भिका मेढे (५५वर्ष) दुचाकीने बुलडाण्याच्या दिशेने येत होते. त्यावेळी आर जे १४. जीडी ३२६४ क्रमांकाच्या ट्रकने मागून दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये दौलत मेढे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतकासह जखमीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून जखमेवर उपचार सुरू आहेत.