भीषण अपघात! धोंडे जेवायला जाणाऱ्या जावयावर काळ कोसळला; इंडिका कारने दिलेल्या धडकेत जागीच ठार; पत्नी जखमी! सुलतानपुरजवळ झाला अपघात! अपघाताआधी पाथर्डी घाटात केले फोटोसेशन...

 
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धोंडे जेवणासाठी सासुरवाडीला जाणाऱ्या जावयावर काळ कोसळला. भरधाव इंडिका कारने  मोटारसायकलला दिलेल्या धडकेत जावयाचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेली पत्नी गंभीर जखमी झाली. मेहकर लोणार रस्त्यावर आज,८ ऑगस्टच्या दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. दांपत्य नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील राहणारे आहेत.

Thfuप्रल्हाद गणपतराव भोपळे(५१) असे अपघात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी अनिता भोपळे (४५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघे पती पत्नी धोंडे जेवणासाठी लोणार येथे जात होते. लोणारला जात असता पती पत्नीने निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पाथर्डी घाटात फोटोसेशन केले. काढलेले फोटो पाहुण्यांना सेंड केले. त्यानंतर काहीच वेळात सुलतानपुर जवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.