भीषण अपघात! खामगाव आगाराची एसटी बस दरीत कोसळली; बसमध्ये होते २७ प्रवाशी! आज सकाळची घटना; प्रवास सुरू करून झाले होते केवळ १५ मिनिट..

 
Fgxg
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १२ जुलैची सकाळ आज जिल्हावासियांसाठी भीषण अपघाताची बातमी घेऊन उजाडला आहे. खामगाव आगाराच्या एस टी बसचा भीषण अपघात झाला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंगी गडावरून ही बस खोल दरीत कोसळली. आज सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहीतीनुसार खामगाव आगाराची ही बस परतीच्या प्रवासात होती. काल सप्तशृंगी गडावर पोहचलेली ही बस मुक्कामी होती. आज सकाळी साडेसहाला बस निघाली. खामगावात ती सायंकाळी साडेचारला पोहचणार होती.
   
  मात्र नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेल्या या गडावर धुके होते. बस गडावरून उतरत असताना धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण हुकले आणि बस खोल दरीत कोसळली. प्रवास सुरू करून अवघे १५ मिनिट झाले होते, तेवढ्यात हा अपघात झाला. बसमध्ये चालक व वाहक मिळून जवळपास २७ प्रवाशी होते. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत बस मधील सर्वच प्रवाशांना प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. काही प्रवाशी गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. एका प्रवाशाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी पोहचत आहेत.