वडनेर भोलजी गावात प्रेमप्रकरणातून दोन समाजात तणाव! "ते" दोघे पळून गेले अन् गाव पेटले! दुकाने, मोटारसायकली जाळल्या,दगडफेकीत तिघे जखमी

 
Rytry
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): त्या दोघांची जात वेगळी..दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले..अर्थात तिचे वय शिकण्याचे होते..मात्र अल्पवयीन असलेल्या तिला घेऊन तो पळून गेला..इकडे गावात मात्र त्यावरून चांगलाच वाद पेटला..पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी त्यावरून दोन गटात वाद होऊन जाळपोळ व दगडफेक करण्यात आली.

   वडनेर भोलजी येथील अक्रम अख्तर बेग याने एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी त्याच्यासह अख्तर अकबर बेग, मुक्तार अकबर बेग व बाबा अकबर बेग यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी ७ च्या सुमारास प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले.  दोन्हीकडील मंडळींनी एकमेकांवर दगडफेक केली, यात तीन ते चार दुकानांची व मोटारसायकलची जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी नाना कळसकर, मोहन अग्रवाल, निंबाजी वसतकर,उज्वल गव्हाळ, मंगेश वानखेडे, शिवा वाघ , अमोल वारूळकर सह ३० ते ३५ व दुसऱ्या गटातील  बाबा मिर्झा , मुक्तार मिर्झा, असलम बेग, अख्तर बेग, मुनव्वर बेग, निसार बेग, मुकरम बेग यांच्यासह इतर १० ते १२ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.

    
दगडफेकीत तिघे जखमी..!

दोन्ही गटातील ६४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंच्या ८ जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालययीन कोठडीत आरोपींची रवानगी केली आहे. सध्या आरोपी बुलडाणा कारागृहात आहेत. दरम्यान दगडफेकीत ३ जण जखमी आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी वडनेरे भोलजी येथे तळ ठोकून आहेत.