मेरा खुर्द गावात तणावपूर्ण शांतता ! शेकडो पोलिसांचा बंदोबस्त; औरंगजेबाबद्दल प्रेम उफाळुन आलेल्या चौघांना अटक! चौकातील हॉटेल, दुकाने बंदच! जिल्हाभरातील शिवभक्तांकडून आज ठिकठिकाणी आंदोलन

 
Fhhg
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): औरंगजेबाबद्दल प्रेम उफाळुन आलेल्या मेरा खुर्द येथील काही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांबंद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. त्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्याने मेरा खुर्द गावात तणाव निर्माण झाला होता. मेरा चौकी वरील काही दुकानांची , लोटगाड्यांची तोडफोड करण्यात आली होती.त्यामुळे रात्रीपासून जिल्हा पातळीवरून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला . सध्या मेरा खुर्द गावात तणावपूर्ण शांतता असून चौकीवरील दुकाने, हॉटेल अद्याप बंदच आहेत.

 Bai

     जाहिरात👆

  होती मेरा खुर्द गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान २० फेब्रुवारीला मेरा खुर्द येथील  एकाने "बाप तो बाप होता है" अशा गाण्याचे औरंगजेबाचा गौरव होईल व छत्रपतींचा अपमान होईल असे स्टेटस ठेवले. त्याच्यासह त्याचा ३ साथीदारांनी देखील तसे स्टेटस ठेवले, ही बाब गावातील शिवभक्तांच्या लक्षात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. मेरा चौकीवरील काही दुकानांची तोडफोड झाली, लोटगाड्या तोडण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी देखील मोठ्या पोलीस बंदोबस्तासह मेरा चौकी येथे पोहचले. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.महाराष्ट्रात राहून मातीशी इमान ठेवण्याऐवजी छत्रपतींशी गद्दारी करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

रात्री उशिरा त्यांच्याविरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या मेरा खुर्द गावात तणावपूर्ण शांतता असली तरी जिल्हाभरातून तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवभक्तांकडून आज जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. देऊळगाव राजा येथेही मेरा खुर्द प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.