वडिलांना म्हणे पाय दुखतोय! खरे कळल्यावर धक्काच बसला; हॉस्पिटल मध्ये भरती करेपर्यंत उशीर झाला होता; १४ वर्षीय मुलाने जीव गमावला..

 
jfsfj
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्पदंश झाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मुलाचा पाय दुखत होता, आधी त्याचे कारण कळले नाही..त्यामुळे रुग्णालयात न्यायला उशीर झाला.परिणामी मुलाने जीव गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
 

  हिरू प्रमोद गिरी असे या मुलाचे नाव असून तो सहाव्या वर्गात शिकत होता. १७ जूनच्या रात्री तो वडिलांना त्याचा पाय दुखत असल्याचे सांगत होता..सामान्य दुखणे असेल असे घरच्यांना आधी वाटले. मात्र नंतर पायाचे दुखणे वाढल्याने खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. मुलाला सर्पदंश झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर कुटुंबीयांना धक्काच बसला. त्याला तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय व नंतर तेथून खामगावच्या सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच हिरूचा मृत्यू झाला.१७ जूनच्या दुपारी हिरू त्यांच्या मित्रांसोबत पाणीपुरवठा योजनेच्या वॉल वर अंघोळीसाठी गेला होता, तिथेच त्याला विषारी सापाने चावा घेतला असावा अशी शक्यता बोलून दाखवल्या जात आहे.