तिला म्‍हणे गाडीवर बस... दोन कुटुंबात झाला राडा!

मोताळा तालुक्‍यातील घटना
 
 
हाणामारी
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः  "तू माझ्या गाडीवर बस... मी तुझ्या नावे माझी दोन एकर शेती करून देईल' असे तरुण विवाहितेला म्‍हणाला पण त्‍यानंतर दोन कुटुंबात मोठा राडा झाला. दोन्‍ही कुटुंबानी एकमेकांच्‍या तक्रारी घेऊन धामणगाव बढे पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी एका कुटुंबातील ८ आणि दुसऱ्या कुटुंबातील ४ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना कोऱ्हाळा बाजार (ता. मोताळा) येथे काल, २ नोव्‍हेंबरला सकाळी घडली.
सौ. कल्पना रमेश शिरकांडे (३५, रा. कोऱ्हाळा बाजार) या महिलेच्या तक्रारीवरून विद्या राजेंद्र गायकवाड, सुनिता गणेश गायकवाड, सुदर्शन ऊर्फ मुन्ना राजेश गायकवाड, रोशन गणेश गायकवाड, अशोक उत्तम गायकवाड, गणेश रामभाऊ गायकवाड, दीपक रामभाऊ गायकवाड, सुषमाबाई दीपक गायकवाड (सर्व रा. कोऱ्हाळा बाजार) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या कुटुंबातील  सुनिता गणेश गायकवाड यांच्‍या तक्रारीवरून रमेश धोंडू शिरकांडे, सौ. कल्पना रमेश श्रीकांडे, भाकर पुंडलिक शेळके, सौ.सुनिता प्रभाकर शेळके यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून मारहाण व जीवे मारण्याच्‍या धमक्या दिल्याचे पहिल्या तक्रारीत म्‍हटले आहे तर दुसऱ्या तक्रारीत गावातील झाडाखाली आणि गोठ्यासमोर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्‍हटले आहे. तपास धामणगाव बढे पोलीस करत आहेत.