BIG BREAKING लोणार मध्ये अँटी करप्शन च्या जाळ्यात अडकला कर निरीक्षक! पैसे खातांना पकडला.....
Aug 14, 2024, 14:49 IST
लोणार(सचिन गोलेच्छा:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार मध्ये आत्ता थोड्या वेळापूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खादाड अधिकाऱ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लोणार नगरपालिकेत कर निरीक्षक पदावर काम करणाऱ्या अन्वर शहा नामक खादाडाला पैसे खाताना रंगेहात पकडण्यात आल्याची पक्की खबर आहे. बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सौ.शीतल घोगरे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली आहे. सध्या कारवाईची पुढील प्रक्रिया सुरू आहे. लाच मागितल्याचे नेमके कारण आणि नेमकी किती लाच मागितली याबद्दलची सविस्तर माहिती याच वृत्तात थोड्या वेळात अपडेट करत आहोत...