पातूर्डा खुर्द येथील तलाठी जाधवने केले तोंड काळे; सातबारा उताऱ्यावर आतेभावाचे नाव घेण्यासाठी केली लाचेची मागणी ! एसीबीने शिकवला धडा..

 
ह्दज
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील तलाठी पंजाबराव जाधव यानी फेरफार उताऱ्यावर तक्रारदाराच्या आते भावाचे नाव आणण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जाधव याला चांगलाच धडा शिकवला असून त्याच्या विरोधात शेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शेतीच्या खरेदीनंतर फेरफार घेवुन सातबारा उताऱ्यावर आतेभावाचे नाव घेण्यासाठी व खरेदीसाठी पातुर्डा खुर्द येथे कार्यरत तलाठी पंजाबराव जाधव हे १० हजार रुपयांची मागणी करत असल्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा यांना प्राप्त झाली. त्यानुसार १३ मार्च २०२४ रोजी लाचमागणी पडताळणी कार्यवाही आयोजीत केली होती. यावेळी तलाठी जाधव याने ८००० रुपयांची लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले. तक्रारदाराला लाचेची रक्कम तात्काळ घेवुन येण्यास सांगीतले परंतु संशय वाटत असल्याने जाधव याने लाच स्विकारली नाही. मधल्या काळात निवडणुकी दरम्यान, तलाठी जाधव इलेक्शन ड्युटीवर होते. जाधव यांना आज २१ मे रोजी एसीबीने ताब्यात घेतले. लाच मागणीबाबत त्याच्या विरोधात कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे दिनांक आज २१ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.