बँकेतून पैसे काढले! ऑटोने घरी जात होते, मध्येच तीस वर्षीय भामट्याने नजर चुकवून सत्तर हजार लंपास केले! काळा आहे चोरटा; नांदुरा शहरातील घटना..!
Aug 22, 2023, 08:06 IST
नांदुरा(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कामानिमित्ताने बँक मधून पैसे काढले ऑटोने घरी जात होते. मात्र मध्येच तीस वर्षीय व्यक्तीने सत्तर हजार लंपास केल्याची घटना नांदुरा शहरात घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार वसंता गोपाळ जवकार वय (५८) वर्ष रा. अलमपूर ता - नांदुरा यांनी, २१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान नांदुरा अर्बन बँक मधून कामानिमित्याने स्वतःचे ७० हजार रुपये काढले होते. ते पैसे घेवून ऑटोने घरी जात होते. यावेळी नांदुरा नगर पालिकाजवळ ऑटोमध्ये बसण्यासाठी येतांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पाठीवर घाण टाकल्याचे ऑटोमध्ये बसलेल्या महिलेने त्यांना सांगितले होते.
यावेळी वसंता जवकार यांनी ७० हजार रुपये प्लास्टिक च्या पिशवीमध्ये ठेवले होते ते त्यांच्या बाजूला ठेवून शर्टवरील त्या अनोळखी व्यक्तीने टाकलेली घाण पुसत असतांना त्या अंदाजे वय ३० वर्षीय काळ्या, पांढऱ्या रंगाचे चौकडीचे शर्ट घातलेल्या अनोळखी व्यक्तीने चोरून नेले आहेत. जवकार यांनी त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. अशी तक्रार २१ ऑगस्ट रोजी जवकार यांनी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पुढील तपास पोहेकॉ जंजाळ हे करीत आहेत.