स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा! डोणगावात राडा!

 
बुलडाणा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)मेहकर तालुक्यातील डोणगाव बस स्थानक परिसरात जागेच्या वादातून काल १ फेब्रुवारीला राडा झाला. वाद इतका प्रकोपला, की कोयता, लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. प्रकरणी धुवल सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह चौघांवर खून्हाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
डोणगाव येथील देवेंद्र आखाडे आणि सातपुते यांचे जागेविषयी मागील महिन्यांपासून वाद सुरू आहे. काल दुपारी डॉ.ज्ञानेश्वर टाले, देवेंद्र आखाडे, वैभव आखाडे उपरोक्त ठिकाणी जमले,त्याठिकाणच्या साहित्यांची त्यांनी नासधूस केली. यावेळी महिलांनी जागेत का आले तसे विचारले असता त्यांनी महिलांना लोटपाठ केली, दरम्यान सातपुते यांचे वडील वाद मिटवण्यासाठी गेले तर त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने ने मारहाण करण्यात आली इतकच नाही, तर तुझा मर्डर करेल अशी धमकीही त्यांनी दिली असे तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीत जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही गटांकडून परस्पर तक्रारी देण्यात आले असल्याचे कळते आहे. पुढील तपास पीएसआय संदीप सावळे करत आहेत. प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी डॉ. टाले यांच्याशी संपर्क केला असता.. त्यांचा फोन बंद आला.