बुलडाण्यात युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या

आई-वडील लहानपणीच वारले होते, काकांनी केला होता सांभाळ!
 
अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; खामगाव तालुक्यातील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील गणेशनगर येथील ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही धक्कादायक घटना काल, १९ नोव्हेंबला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
सागर मुकुंदा आवटे असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. सागरचे आई- वडील लहानपणीच वारलेले आहेत. काकांनीच त्‍याचा सांभाळ केला होता. सायंकाळी घरातील सदस्य वाढदिवसानिमित्त बाहेर नातेवाइकांकडे गेले होते. त्‍याचे काका तानाजी शिवानंद आवटे दुकानात कामासाठी गेले होते. ते रात्री घरी परतले. त्‍यांनी दरवाजा वाजवला पण कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्‍यामुळे मागील खोलीच्या खिडकीतून बघितले असता सागरने घराच्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आत्‍महत्‍येचे कारण आज सकाळपर्यंतही समोर अाले नव्हते. तपास पोलीस उपनिरिक्षक सुधाकर गवारगुरु करत आहेत.