Amazon Ad

BREAKING जिल्हा मृद सर्वेक्षण कार्यालयातील उपकरणांची चोरी! अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) येथील डी. एस. डी. मॉल भागातील जिल्हा मृद सर्वेक्षण कार्यालयातून माती तपासणी, सर्वेक्षणाचे उपकरणे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत लिपिक धनंजय देवकर यांनी शहर पोलीस ठाण्यात आज ३० मे, रोजी तक्रार दिली.
माती परिक्षण करण्यासाठी लागणारी वापरात नसलेली जुने उपकरणे भांडार कक्षामध्ये ठेवलेले होते. यात अंदाजे २० नग उपकरणे असतील. दरम्यान, २४ मे रोजी सायंकाळी ६:१५ वाजता कार्यालयातील सर्व कर्मचारी कार्यालय बंद करून घरी गेले. त्यांनतर दुसऱ्या दिवशी २७ मे रोजी सकाळी ९:३० वाजता कार्यालयातील महीला शिपाई श्रीमती कीकराळे यांनी कार्यालय उघडले असता तेव्हा भांडार कक्षाचा दरवाजा त्यांना उघडा दिसला. आत जावुन पाहीले तर त्यांना काही उपकरणे दिसली नाही. व माती चाळणी कक्षाचा दरवाजा तोडलेला दिसला. सदर घटना शिपाई महिलेने इतर कर्मचाऱ्यांना सांगितली. त्यानंतर भांडार कक्षातील उपकरणांची पाहणी केली. त्यावेळी २ नग प्लेमफोटोमिटर किंमत ४ हजार, काम्प्रेसर मोटार किंमत ४ हजार, स्ट्राबेलायझर किमत २५०० तसेच . इतर निरुपयोगी वस्तु किंमत हजार असा एकुण ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीस आले असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.