रातोरात बसवला शिवरायांचा पुतळा!

भेंडवळ खुर्दमधील घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल
 
जळगाव जामोदमध्ये पती-पत्‍नीचा राडा!; परस्परविरोधी तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्‍यातील भेंडवळ खुर्द येथे ग्रामपंचायतीची परवानगी न घेता शासकीय जमिनीवर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुणीतरी बसवला. गावात कायदा सुव्यवस्‍थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन ग्रामसेवकांनी तातडीने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात पुतळा बसविणाऱ्या व्यक्‍तीविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भेंडवळ खुर्दचे ग्रामसेवक गणेश चोपडे (रा. झाडेगाव ता. जळगाव जामोद) हे काल, १७ डिसेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास भेंडवळ बुद्रूक येथे करवसुलीसाठी सरपंच व शिपायासोबत असताना गटविकास अधिकाऱ्यांचा फोन आल्याने त्‍यांनी भेंडवळ खुर्दमध्ये जाऊन पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या मागील भागात बजरंग बली मंदिराजवळ ग्रामपंचायतीच्या जागेत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसविलेला आहे. दोन फूट उंचीचा विटा- सिमेंटचा ओटा बांधून त्‍यावर ५ फुटांचा पुतळा आहे.  १६ डिसेंबरच्या रात्री साडेअकरापासून १७ डिसेंबरच्या सकाळी सहापर्यंत रातोरात कुणीतरी हा पुतळा बसवला आहे.