दिवसाची सुरूवात वाईट बातमीने! मलकापूरात मोठा अपघात; दोन ट्रॅव्हल समोरासमोर भिडल्या; ५ प्रवाशांचा मृत्यू; २५ ते ३० जखमी! मृतकांमध्ये अमरनाथ यात्रेकरुंचा समावेश! एसपी कडासने घटनास्थळी पोहोचले

 
Accident
मलकापूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): आज २९ जुलैची सुरुवात वाईट बातमीने झाली आहे. मलकापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आज पहाटे ३ वाजता भीषण अपघात झाला. दोन ट्रॅव्हल समोरासमोर धडकल्या, त्यात ५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ ते ३० जखमी आहेत. जखमीपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतकांमध्ये अमरनाथ यात्रा करून घराकडे परतणाऱ्या प्रवाशांचा सहभाग आहे.
प्राप्त माहितीनुसार ट्रॅव्हल क्रमांक( एम एच ८, ९४५८) मध्ये अमरनाथ वरून तीर्थयात्रा करून आलेले यात्रेकरू होते. तर दुसरी ट्रॅव्हल ( एम एच २७ बी.एक्स ४४६६) नागपूर वरून नाशिक कडे जात होती. दोन्ही ट्रॅव्हल मलकापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील लक्ष्मी नगर उडान पुलावर समोरासमोर धडकल्या. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रॅव्हल अक्षराच्या चिरडल्या गेल्या. अपघातात दोन्ही गाड्यांमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झालाय.२५ ते ३० जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बुलडाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसपी सुनील कडासने घटनास्थळी पोहचले आहेत.