ब्रेक फेल झाल्याने एसटी पलटली! दरीत कोसळणार होती पण डोंगराला धडकवली; राजूर घाटातील अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ३१ जणांचे जीव..!

 
ugu
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्याहून जामनेर( जि.जळगाव) कडे जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने बस पलटी झाली. बुलडाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटात आज, २३ फेब्रुवारीच्या दुपारी पावणेचारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात २५ जणांना किरकोळ दुखापत झाली.

   gyuyug

           (जाहिरात👆)

राजूर घाट हे अपघातप्रवण क्षेत्र असल्याने इथे अनेकदा अपघात होतात. एम.एच ४०, एन ९०९५ क्रमांकाची बुलडाणा येथून जामनेर कडे जात होती. बस मध्ये २९ प्रवाशी होते. बस घाटातून जात असताना बस चे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले. बस दरीच्या दिशेने जात असताना चालक लोखंडे यांनी प्रसंगावधान राखून दरीकडे जात असलेली बस डोंगराकडे वळवली आणि डोंगराला धडकून एसटी बस पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस व एसटी विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

बस मध्ये असलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. चालकाने प्रसंगावधान राखल्याने २९ प्रवाशांसह चालक व वाहक यांचा जीव वाचला. मात्र असे असले तरी भंगार बस रस्त्यावर काढून प्रवाशांच्या जिवाशी एसटी विभाग का खेळत आहे? असा प्रश्न विचारल्या जात आहे.