अंगावर धुळ उडाल्याच्या कारणावरून एसटी चालकाला लाथा, बुक्यांनी मारहाण! शेगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा...

 
Vvvv
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अंगावर धूळ उडाल्याच्या कारणावरून एस.टी. महामंडळाच्या बस चालकाला मारहाण केल्याची घटना काल गुरूवार, १ मे रोजी घडली. 
 याप्रकरणी शेगाव बस आगारातील हेड मेकॅनिक गजानन निकडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, सायंकाळी ६ वाजता अडचण रोडवरील एसटी डेपो जवळ ही घटना घडली. दरम्यान चालक मो.रिजवान मो.याकूब हे अळसना रोडवरील डेपो मध्ये बस आणत असताना अंगावर धुळ उडाल्याचे कारणावरून सोनू कैलास नाटेकर (२४ वर्ष) , ज्ञानेश्वर लक्ष्मण तायडे (२७ वर्ष) यादोघांनी बसचा पाठलाग केला. त्यांनतर पीडित पीडितचालका जवळ येऊन त्याच्याशी वाद घातला. इतकंच नाही तर लाथा बुक्यांनी मारहाण करून चालक मो. रिजवान यांना जखमी केले. त्यांच्या नाका तोंडातून रक्त निघत होते. दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले. प्राप्त तक्रारीनुसार सोनू नाटेकर, लक्ष्मण तायडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.