BREAKING चिखलीत भर चौकात एसटी चे ब्रेक फेल? पुढे जे घडलं ते धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना...

 
Jfjfn
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीत थोड्या वेळापूर्वी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिखलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार बस चिखली आगाराची आहे. बस मंगरूळ वरून चिखलीकडे येत असताना चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसचे ब्रेक फेल झाले. बस व नियंत्रण मिळवण्याच्या नादात बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांना उडवले आहे. सुदैवाने या प्रकारात काही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी पोलिस आणि आगार व्यवस्थापक पोहचले आहेत. दरम्यान या संदर्भात आगार व्यवस्थापक श्री इलामे यांच्याशी संपर्क साधला असता, घटना घडल्याचे सांगत नेमके ब्रेक फेल झाले की दुसरं काही याबद्दल तपासणी झाल्यावरच सांगता येईल असे ते म्हणाले.
चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला..
 जिल्ह्यात भंगार बसेस ही मोठी समस्या झाली आहे. जिल्ह्यात अनेकदा भंगार एसटी बसेसमुळे अपघात झाले आहेत. याआधीही काही महिन्याआधी हातणी येथील घाटात एसटी बसचे ब्रेक फेल झाले होते. आता पुन्हा तशीच घटना घडल्याने एसटी प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. नादुरुस्त बसेस चालकांच्या हातात द्यायच्या आणि त्यामुळे काही अपघात झाल्यास उलट चालकांना जबाबदार धरायचे असा प्रकार एसटी महामंडळाकडून सुरू आहे. आजच्या चिखली येथील घटनेतही चालक श्री. सुरडकर यांनी आपले कौशल्य पणाला लावून बसवर नियंत्रण मिळवले, त्यामुळेच मोठा अनर्थ टळला एवढे मात्र नक्की..