राधिकाच्या खून प्रकरणी तपासाला वेग! पोलिस अधिकाऱ्यांच्या झोपा हरवल्या; तपासासाठी जुन्या जाणत्यांनाही बोलावले! पोलीस मुळापर्यंत पोहचलेत! संशयितांना उचलले, पण...

राधिकाच्या खुनाचा उलगडा करण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची निर्मिती केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे , घटनास्थळ अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असल्याने अंढेरा पोलीस ठाण्यात बराच वेळ कार्यकाळ घालवलेल्या मात्र सध्या दुसऱ्या पोलीस ठाण्यात असलेल्या काही निवडक पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा या तपास पथकात समावेश करण्यात आला आहे. या परिसरातील गुन्हेगारांची खडान खडान माहिती या जुण्या - जाणत्यांना असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा या तपासात होऊ शकतो.
संशयितांची कसून चौकशी..!
घटना उघडकीस आल्यांपासून पोलिसांनी आतापर्यंत अनेकांची कसून चौकशी केली. त्यातून आता निवडक संशयीतांपर्यंत पोलीस पोहचले असल्याचे समजते. आरोपी राधिकाच्या परिचयातील नसावा असा पोलिसांचा कयास असल्याने अपरिचित व्यक्ती कशासाठी तिची निर्घृण हत्या करेल या प्रश्नांचे उत्तर पोलीस शोधत आहेत. अद्याप शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला नसल्याने लैंगिक अत्याचार किंवा तसा प्रयत्न झाला का हे समोर आलेले नाही, मात्र तसा अत्याचार किंवा अत्याचाराचा प्रयत्न करूनच तिला ठार मारले असावे अशी चर्चा आहे. पोलिस आता या प्रकरणात जवळजवळ पोहचले असून पुढच्या काही तासांत आरोपी निष्पन्न होईल अशी शक्यता आहे.