स्पीड वाढला! जिल्ह्यात ४ दिवसात १२ जणी बेपत्ता; माय - बाप शोधून शोधून थकले

 
pori
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातून बेपत्ता होण्याचे सत्र काही  थांबतांना दिसत नाही. जिल्ह्यात अलीकडच्या ४ दिवसांत १२ जणी बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. यात पुरुषांचा आकडा मिळविल्यास बेपत्ता होणाऱ्यांची संख्या १७ एवढी होते.

 २१ एप्रिल ते २४ एप्रिल या ४ दिवसांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात १७ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यात १२ तरुणींचा समावेश आहे. दरवर्षी लगीनसराई सुरू झाल्यानंतर बेपत्ता होणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे.

बहुतांश तरुणी काही दिवसानंतर लग्न करून गावाकडे परत येतात किंवा आपण लग्न केल्याचे कुटुंबीयांना फोन करून सांगतात, मात्र कुटुंबीय तशी माहिती पोलिस ठाण्यात कळवत नाहीत त्यामुळे कुणा - कुणाचा  शोध  लागला याची  खात्रीशीर माहिती समोर येत नाही. बेपत्ता होणाऱ्यांचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असल्यास पोलीस केवळ बेपत्ता झाल्याची नोंद करतात. मात्र बेपत्ता होणारी किंवा होणारा जर अल्पवयीन असेल तर अशा प्रकरणात पोलीस तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करतात.