नको ते करणाऱ्या पोलिसाला एसपी कडासनेंनी घडवली अद्दल! थेट निलंबित केले..

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नको ते करण पोलीस कर्मचाऱ्याच्या चांगलच अंगलट आलय..जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे एसपी कडासने यांनी ही कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन खेर्डे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकू नका असे पोलीस वारंवार सांगत असतात. त्यासाठी पोलीस सायबर जागृती अभियान देखील राबवितात. मात्र आता पोलिसानेच असा कारनामा केल्याची बाब उघड झाली. पोलिसांच्याच एका व्हॉटस् ॲप ग्रुप वर गजानन खे याने एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ही बाब एसपी सुनील कडासने यांना कळताच एसपी कडासने यांनी गजानन खेर्डे यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत.