धुऱ्याचा वाद पेटला! एकावर चौघे तुटून पडले अन्...! मलकापूर तालुक्यातील प्रकरण

 
Bxnx
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धुऱ्यावर कुंपन घालण्याच्या कारणावरून वाद झाल्याने चौघांनी मिळून शेतकऱ्याला मारहाण करून जखमी केल्याची घटना विटाळी, धानोरा शिवारात घडली.
शहरातील हरिकिरण सोसायटीमधील रहिवासी तथा सध्या पुणे येथे राहणारे सतीश नवलसिंग इंगळे यांच्या विटाळी, धानोरा शिवारातील शेतामध्ये धुऱ्यावर तारेचे कुंपन घालण्याचे काम २५ ऑक्टोबरला सुरू होते. विष्णू राऊत व दीपक वानखेडे (विटाळी) हे खड्डे खोदत असताना बाजूच्या शेतातील महादेव सुखदेव भगत (६५, नांदुरा ), मधुकर सुखदेव भगत (५०), संजय वासुदेव भगत (२६), अक्षय वासुदेव भगत (२२) सर्व रा. धानोरा यांनी विरोध केला. 
  शेतातून आम्हाला रस्ता हवाय म्हणत वाद घातला. चारही आरोपींनी त्यांना लाठाकाठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. संजय भगत याने मजूर वानखेडे याच्या हातातून लोखंडी पहार हिसकावून नेली. त्यांचा चुलतभाऊ सतीशने आरोपींच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे..