बुलडाण्याच्या पोलिसांची बदनामी करणाऱ्यांना चपराक!

Buldana Live Exclusive : बुलडाणा लाइव्हने आणले अवैध धंद्यावरील कारवाईचे सत्‍य बाहेर!!
 
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात अवैध धंदे सर्रास सुरू असल्याचे आरोप करून बुलडाणा पोलिसांची बदनामी करणाऱ्यांना मोठी चपराक "बुलडाणा लाइव्ह'च्या या बातमीतून बसणार आहे. १ ऑक्‍टोबरपासून २० नोव्‍हेंबरपर्यंत "बुलडाणा लाइव्ह'ने जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि जुगाराच्या अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यांची आकडेवारी गोळा केली असता मोठे आकडे समोर आले आहेत. या दीड महिन्याच्या कालावधीत अवैध दारू विक्रीच्या ३४४ कारवाया जिल्ह्यात पोलिसांनी केल्या असून, यातून ११ लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीची दारू पकडली आहे. जुगाराच्या १७४ कारवाया करून १ लाख ८५ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. तब्बल पाचशेच्यावर लोकांना पकडून (अवैध दारू प्रकरणी ३२१ आणि जुगार प्रकरणी २०१ ) कारवाई केली आहे. विशेष म्‍हणजे, अवैध धंदे जिल्ह्यात सुरू असल्याचा आरोप करणाऱ्यांना जर अवैध दिसत असतील तर ते पोलिसांना का सांगत नाहीत की अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू आहे म्‍हणून त्‍यांच्‍या पायाखालची वाळू सरकली आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्‍यांच्‍या आरोपांवरच मोठा संशय निर्माण होत आहे.

पोलिसांच्‍या नागरिकांसाठी उपलब्‍ध असलेल्या citizen.mahapolice.gov.in या पोर्टलवरील आणि प्रत्यक्ष पोलीस ठाण्यातील संपर्कावरून बुलडाणा लाइव्हने कारवाईची आकडेवारी गोळा केली. अनेक पोलीस ठाण्यांच्या इंटरनेट कनेक्‍टिव्‍हीटीत अडचणी येत असल्याने ते नियमित आपले एफआयआर वेबसाईटला अपलोड करू शकत नाहीत. असे पोलीस ठाणी दहाच्या आसपास आहेत. त्‍यांचा आकडा लक्षात घेतला तर कारवायांची संख्या वाढते. अवैध धंदे सुरू असल्याच्या अनेक जण तक्रारी करतात. पण त्‍याबद्दल माहिती पोलिसांना देण्यास कचरतात. त्‍यांनी पोलिसांशी संपर्क केला पाहिजेत. स्थानिक पोलिसांबद्दल प्रश्न असतील तर थेट कर्तव्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याची गरज आहे.

बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी अवैध दारूच्या २९ कारवाया केल्या असून, जुगाराच्या ६ कारवाया केल्या आहेत. २४ हजार ३७० रुपयांची दारू तर जुगाराचा ७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातून अवैध दारू प्रकरणी ३५ तर जुगार प्रकरणी ९ जणांवर कारवाई केली. बुलडाणा शहर पोलिसांनी अवैध दारू विक्रीच्या १९ कारवाया केल्या असून, यातून २० हजार ९७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि १९ जणांना कारवाई केली. जुगाराच्या ७ कारवाया केल्या असून, ९४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ७ जणांना ताब्‍यात घेतले.
बोराखेडी पोलिसांनी अवैध दारू विक्रीच्या २८ कारवाया करत ४६ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल केला व २८ जणांना ताब्‍यात घेतले. जुगाराच्या १५ कारवाया करून १० हजार २९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व २६ जणांना पकडले. धामणगाव बढे पोलिसांनी अवैध दारू विक्रीच्या १० कारवाया केल्या असून, ७ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ११ जण ताब्‍यात घेतले. जुगाराच्या ६ कारवाया करून १ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ६ जणांना पकडले.

चिखली पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर २२ कारवाया केल्या असून, ५६ हजार ८६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत २२ जणांना पकडले. जुगारावर १४ कारवाया करून १८ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १४ जण पकडले. अमडापूर पोलिसांनी अवैध दारू विक्रीच्या १२ कारवाया करत ९६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व १५ आरोपी पकडले. जुगारावर सात कारवाया करून ३ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ८ जण ताब्‍यात घेतले आहेत.

अन्य पोलीस ठाण्यांच्या अशा आहेत कारवाया...

 • लोणार पोलीस ठाणे ः अवैध दारू ९ कारवाई, जप्त मुद्देमाल ६५६८ रुपये, आरोपी ९, जुगार २ कारवाई, जप्त मुद्देमाल १०५८५ रुपये, आरोपी २
 • बिबी पोलीस ठाणे ः अवैध दारू ९ कारवाई, जप्त मुद्देमाल ५६१०, आरोपी ९, जुगार ४ कारवाई, जप्त मुद्देमाल १३ हजार ८३० रुपये, आरोपी १८
 • देऊळगाव राजा पोलीस ठाणे ः अवैध दारू २ कारवाई, जप्त मुद्देमाल २४६० रुपये, आरोपी २
 • डोणगाव पोलीस ठाणे ः अवैध दारू १३ कारवाई, जप्त मुद्देमाल ३५३४० रुपये, आरोपी १३, जुगार ८ कारवाई, मुद्देमाल ५१८० रुपये, आरोपी ८
 • हिवरखेड पोलीस ठाणे ः अवैध दारू ३ कारवाई, जप्त मुद्देमाल १२८० रुपये, आरोपी ३, जुगार ४ कारवाई, जप्त मुद्देमाल ३२०५ रुपये, आरोपी ४
 • जलंब पोलीस ठाणे ः अवैध दारू १७ कारवाई, जप्त मुद्देमाल ३७७१५ रुपये, आरोपी १७, जुगार ५ कारवाई, जप्त मुद्देमाल २१६५ रुपये, आरोपी ९
 • जानेफळ पोलीस ठाणे ः अवैध दारू ८ कारवाई, जप्त मुद्देमाल ५,३४० रुपये, आरोपी ८, जुगार ६ कारवाई, मुद्देमाल १५९५ रुपये, आरोपी ६
 • खामगाव शहर पोलीस ठाणे ः अवैध दारू ११ कारवाई, जप्त मुद्देमाल ३२२३० रुपये, आरोपी ११
 • खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे ः अवैध दारू १५ कारवाई, जप्त मुद्देमाल १२०५२० रुपये, आरोपी १५, जुगार ६ कारवाई, जप्त मुद्देमाल ८००५ रुपये, आरोपी ६
 • किनगाव राजा पोलीस ठाणे ः अवैध दारू १ कारवाई, जप्त मुद्देमाल ७१० रुपये, आरोपी १
 • मेहकर पोलीस ठाणे ः अवैध दारू ५ कारवाई, जप्त मुद्देमाल २,९४० रुपये, आरोपी ५, जुगार १३ कारवाई, जप्त मुद्देमाल १०५८५ रुपये, आरोपी १३
 • पिंपळगाव राजा पोलीस ठाणे ः अवैध दारू १३ कारवाई, जप्त मुद्देमाल ६६१२० रुपये, आरोपी १३, जुगार ८ कारवाई, जप्त मुद्देमाल ४९२० रुपये, आरोपी ८
 • साखरखेर्डा पोलीस ठाणे ः अवैध दारू ७ कारवाई, जप्त ७३,५४० रुपये, आरोपी ७, जुगार २ कारवाई, मुद्देमाल १३९० रुपये, आरोपी २
 • शेगाव शहर पोलीस ठाणे ः अवैध दारू १२ कारवाई, जप्त मुद्देमाल १११६३५ रुपये, आरोपी १२, जुगार १३ कारवाई, मुद्देमाल १५,६३० रुपये, आरोपी १६
 • शेगाव ग्रामीण पोलीस ठाणे ः अवैध दारू ९ कारवाई, जप्त मुद्देमाल ४७६५ रुपये, आरोपी ९, जुगार ४ कारवाई, जप्त मुद्देमाल २६०० रुपये, आरोपी ४
 • शिवाजी नगर पोलीस ठाणे ः अवैध दारू १८ कारवाई, जप्त मुद्देमाल ८३४५० रुपये, आरोपी १८, जुगार १६ कारवाई, जप्त मुद्देमाल १२२९० रुपये, आरोपी १८
 • अंढेरा पोलीस ठाणे : अवैध दारू २५ कारवाई, जप्त मुद्देमाल ४० हजार रुपये, आरोपी २५, जुगार १० कारवाई, जप्त मुद्देमाल ४ हजार रुपये, आरोपी १४

कारवायांसाठी यांनी केले नेतृत्त्व...
कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त (खामगाव), बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक बळीराम गिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बुलडाण्याचे सचिन कदम, मेहकरचे विलास यमावार, खामगावचे अमोल कोळी, मलकापूरचे अभिनव त्यागी, देऊळगाव राजाचे सुनिल सोनवणे यांच्‍या नेतृत्त्वात या कारवाया ठाणेदार अमडापूरचे नीलेश अपसुंदे, बोराखेडीचे राजेंद्र पाटील, बुलडाणा शहराचे प्रदीप साळुंके, बुलडाणा ग्रामीणचे गिरीश ताथोड, चिखलीचे अशोक लांडे, धामणगाव बढेचे चंद्रकांत ममताबाडे, देऊळगाव राजाचे जयवंत सातव, डोणगावचे नागेशकुमार चतरकर, हिवरखेडचे गजानन वाघ, जलंबचे धीरज बांडे, जानेफळचे राहुल गोंडे, खामगाव शहरचे प्रदीप त्रिभुवन, खामगाव ग्रामीणचे सुरेश नाईकनवरे, किनगाव राजाचे युवराज रबडे, लोणारचे प्रदीप ठाकूर, मेहकरच्या निर्मला परदेशी, पिंपळगाव राजाचे सतीश आडे, साखखेर्डाचे जितेंद्र आडोळे, शेगाव शहरचे अनिल गोपाळ, शेगाव ग्रामीणचे दिलीप वडगावकर, शिवाजीनगरचे अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांनी केल्या.