सायेब.. एकटी मीच वाचले, त्या दोघी जागेवरच गेल्या हो! एखादा स्फोट होतो तसा आवाज झाला सायेब, दोघी ड्रायव्हर साईटला बसल्या होत्या मी कंडक्टर साईटला होते!

अपघातातून वाचलेल्या शोभाबाईंनी "बुलडाणा लाइव्ह" ला सांगितला आखो देखा हाल..

 
djfdfj
सिंदखेडराजा( बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "सायेब आम्ही पुण्यातच मजुरी करतो..मोठ्या बहिणीच्या नातीच लग्न होतो म्हणून पुण्यातल्या वाकडेवरून बस मधी बसलो..आम्ही सुलतानपूरले उतरणार होतो सायेब..अर्ध्या तासाचा रस्ता राह्यला व्हता..मह्या मोठी बहिणीची मुलगी आन मही वहिनी ड्रायव्हर साईटले बसल्या होत्या..मी कंडक्टर साईटले होते सायेब..६ वाजता स्फोट व्हतो तसा आवाज झाला सायेब..ड्रायव्हर साईट बंधी चिरली..मी एकटीच वाचले, त्या दोघी जागेवरच गेल्या हो सायेब...."मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील मूळच्या राहणाऱ्या अन् सध्या पुण्यात मजुरीकाम करणाऱ्या शोभाबाई मुरलीधर वाठोरे यांचे हे शब्द काळीज पिळवटून टाकायला लावणारे आहेत.. मेहकर सिंदखेडाजा रस्त्यावर आज,२५ मे च्या सकाळी एसटी बस आणि कंटेनरच्या झालेल्या अपघातात शोभाबाई जखमी झाल्यात, त्यांच्या मोठी बहिणीची मुलगी आणि वहिनी या अपघातात जागीच ठार झाल्यात. सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शोभाबाईंनी अपघात नेमका कसा घडला ते सांगितलं..!
 

    
 शोभाबाई वाठोरे या मूळच्या लोणी गवळी येथील राहणाऱ्या आहेत. सध्या त्या मुलांसोबत पुण्यात राहतात आणि मजुरीकाम करून उदरनिर्वाह करतात. उद्या,२४ मे ला त्यांच्या मोठ्या बहिणीच्या नातीचे राजेगावला लग्न आहे, त्यासाठी त्या त्यांच्या मोठ्या बहिणीची मुलगी गोकर्णा रामदास खिल्लारे(४५, रा. केळवद, बुलडाणा) व वहिनी वनमाला किशोर पवार(३०, बेलगांव,वाशिम) यांच्यासोबत  पुण्यातल्या वाकोडीवाडी वरून बस मध्ये बसल्या होत्या. त्यांनी सुलतानपुरचे तिकीट काढलेले होते. सुलतानपुरला उतरल्यानंतर त्या राजेगावला जाणार होत्या. 

   बंधी बस चिरली..

"गोकर्णा अन् वनमाला  दोघी ड्रायव्हर साईटला अन् मी कंडक्टर साईटला होते सायेब..सकाळी ६ वाजता स्फोट व्हतो तसा आवाज झाला, ड्रायव्हर साईट ची बंधी बस चिरली..मी एकटी वाचले पण त्या दोघी जागेवरच गेल्या सायेब..." असे शोभाबाई हुंदका आवरत सांगत होत्या.. त्या गावातले लोक लवकर मदतीले धावले, कोणीतरी मले बस मधून बाहेर काढंल..ड्रायव्हर साईटच्या बंध्या काचा गीचा फुटल्या व्हत्या..मीच जोरजोरात ओरडत ओरडत व्हते..पण ज्यांना जास्त लागलं त्यांच्या तोंडून शब्द बी निघत नव्हता.. अंबुलन्स, पोलिस, डॉक्टर लवकर आले असते तर काही वाचले असते.." असेही शोभाबाई म्हणाल्या..! शोभाबाईंच्या तोंडाला आणि गुडघ्याला मार लागलेला असून त्यांच्या सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.