शेगावात पाप! देहविक्री करण्यासाठी मुंबईच्या २ तरुणींना आणले; पोलिसांची अड्ड्यावर धाड ! युवतीसह ६ जणांना घेतले ताब्यात
Updated: Sep 13, 2022, 09:15 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शेगाव येथून जवळच असलेल्या जवळा रोडवर सुरू असलेल्या एका देह व्यापाराच्या अड्डयावर पोलिसांनी धाड टाकली. त्यामध्ये मुंबईच्या दोन युवतीसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आल्याची घटना काल ८ मे रोजी दुपारी २:३० वाजता घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.
जवळा रोडवरील एका पेट्रोलपंपा मागे असलेल्या घरात देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा मारला असता शहरातील काही इसम आर्थिक फायद्यासाठी मुंबई येथील दोन युवतींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याचे उघड झाले. आरोपी प्रेम गणेश लहाने (२० वर्ष) रा. जवळा, सुमित सखाराम जाधव रा. शेगाव, अमोल प्रकाश बांगर रा. बावनबिर यांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. ज्या खोलीत देह व्यापार चालतो त्या खोलीची झडती पोलिसांनी घेतली. तेव्हा त्या ठिकाणी दोन युवती आढळून आल्या. चौकशी दरम्यान एका महिलेने पोलिसांना सांगितले की, देह व्यापाराच्या अनुषंगाने एका इसमाने ५ मे रोजी त्यांना शेगाव येथे बोलावून घेतल्याची आपबिती सांगितली. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत एकूण ९ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. उपरोक्त आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.