धक्कादायक; डॉक्टर व पोलीस सांगून दोघांनी काढली विवाहितेची छेड! पतीचे अपहरण करून हातपाय तोडण्याची धमकीही दिली.. खामगाव शहरातील घटना.

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खामगाव शहरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. डॉक्टर व पोलीस असल्याचे सांगत दोघांनी घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून दोघा वासनाधीनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 
Fjj 
 ३० मे रोजी ही घटना उघडकीस आली. खामगाव शहरातील एका भागातील रहिवासी विवाहितेने शहर पोलिसांत तक्रार दिली, २७ मे रोजी रात्री ८ वाजता पिडीतीचे पती घरी नसताना आकाश वासुदेव इंगळे (३० वर्ष) रा. भालेगाव बाजार, व नितीन बाबुराव सूर्यवंशी (३३ वर्ष) रा. तांदुळवाडी. हे दोघे घरात घुसले. 'तुझे पती कुठे आहे असे दोघांनी विचारले. पती बाहेरगावी गेल्याचे पीडितेने सांगितले. त्यावेळी आकाश व नितीन यांनी आपण डॉक्टर व पोलीस असल्याची खोटी बतावणी केली. वाईट उद्देशाने हात पकडून ओढतान करून पिडीतेचा विनयभंग केला. इतकेच नाही तर " तुझ्या पतीचे एखाद्या दिवशी अपहरण करून त्याला गायब करू असे म्हणत पिडीतेसह तिच्या पतीला अश्लील शिवीगाळ केली. कुऱ्हाडीने हातपाय तोडण्याची धमकी देत दोघा पती-पत्नींवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून खोट्या केसेस मध्ये अडकवू अशी धमकीही दोघांनी दिली. 'पोलीस अधिकारी आमच्या चांगल्या ओळखीचे आहेत, ते आम्हाला काहीही करणार नाही असे त्या दोघांनी पीडित विवाहितेला धमकाविले. आरोपी आकाश इंगळे व नितीन सूर्यवंशी दोघेही गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत असे विवाहित पिडीतेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.