धक्कादायक; बलात्काराच्या घटनेने बुलडाणा हादरले!खासगी रुग्णालयातील ३२ वर्षीय नर्सवर २३ वर्षीय ब्रदरचा बलात्कार; बदनामीची धमकी देत इज्जत लुटली..

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका ३२ वर्षीय नर्स वर २३ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा संताप जनक प्रकार समोर आला आहे या प्रकरणाची तक्रार पीडित नर्सने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी पापी २३ वर्षे तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. विशाल गजानन बोराडे ( रा.जुनागाव) असे या वासनांध तरुणाचे नाव असून तोदेखील एका खाजगी रुग्णालयात ब्रदर्स म्हणून नोकरी करतो. 
  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत नर्स बुलडाणा शहरातीलच राहणारी आहे. पिडीत नर्स आणि आरोपी विशाल २०२० मध्ये शहरातील एका हॉस्पिटल मध्ये नोकरीला होते. तिथेच दोघांची ओळख आणि त्यातून मैत्री निर्माण झाली. त्यानंतर दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे देखील सुरू झाले. पुढील काळात विशालने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याचाच उपयोग करून विशाल तिला बदनामीची धमकी देऊ लागला, त्यामुळे पुन्हा वारंवार विशालने त्याची शारीरिक भूक भागवली. पिडीत नर्स च्या मुलांना जिवे मारून टाकीन अशी धमकी देखील विशालने दिल्याचे पिडीत नर्स ने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विशाल विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पिडीत नर्स ही अनुसूचित जातीची असल्याने यात ॲट्रॉसिटीचे देखील कलम समाविष्ट करण्यात आले असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत.