धक्कादायक; बुलढाण्यात १६ वर्षीय मुलाची आत्महत्या! घरी कोणी नसताना लावला गळफास, आत्महत्येचे कारण?
Jun 8, 2024, 09:14 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील महावीर नगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल ७ जूनच्या सायंकाळी उघडकीस आली.
आदित्य संजय गिरी असे मृतक अल्पवयीन मुलाचे नाव आहे. दुपारी घरी कोणी नसताना त्याने गळफास लावून स्वतः ला संपविले. कुटुंबातील सदस्य जेव्हा घरी पोहचले तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. आदित्य याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आदित्यने आत्महत्या का केली? हे अजून कळू शकले नाही. या घटनेने आदित्यच्या कुटुंबीयांना, मित्र परिवाराला धक्का बसला आहे. इतक्या कमी वयात स्वतःला संपवण्याचा निर्णय आदित्यने का घेतला हे देखील समजले नाही.